महाराष्ट्रसातारासामाजिक

विरंगुळा महिला सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था  आयोजित मेढा येथे रंगले पावसाळी आठवण कविसंमेलन पावसाळी आठवण कविसंमेलन

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ

मेढा.दि.१२. मेढा ता.जावळी येथे विरंगुळा महिला सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था आयोजित पावसाळी आठवण कविसंमेलनाचा कार्यक्रम महात्मा गांधी वाचनालय मेढा येथे संप्पन झाला.

सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता जावली इनामदार साहेब व एस् आर.भिंगारे.साहेब.बाल विकास अधिकारी जावली यांचे उपस्थितीत कवयित्री सौ जयश्रीताई गणेश माजगावकर यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात आठवण चारोळी संग्रह चे लोकार्पण. करण्यात आले आपल्या मनोगतात आठवण चारोळी संग्रह वाचकांना नक्कीच आवडेल असा विश्वास जयश्रीताई यांनी व्यक्त केला.आठवण चारोळी संग्रह चे मलपृष्ठ रेखाचित्रकार, सुजाता त्रिंबके, कन्या शाळा सातारा ची विद्यार्थिनी चा सन्मान मान्यवरांकडून करण्यात आला.

कोरोना आपत्कालीन परिस्थितीत संपूर्ण मेढा व जावली तालुक्यातील अनेक ठिकाणी मोफत सनिटायझर स्प्रे करून काळजी घेणारे श्री साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला.महात्मा गांधी वाचनालय कर्मचारीवर्ग महिलांचा साडी चोळी देऊन संस्था संचालिका गौरी माजगावकर यांनी सन्मान केला.संस्थेचा परिचय सौ जयश्रीताई माजगावकर यांनी करून दिला,संपूर्ण कार्यक्रम चे सूत्रसंचालन कवी अविनाश चव्हाण फलटण यांनी केले सहकार्य अजित मारूलकर, प्राजक्ता माजगावकर, गौरी माजगावकर, गिरीश माजगावकर यांनी केले,उपस्थित मान्यवरांचा सन्मान गणेश माजगावकर यांनी केला.

दरम्यान जिल्ह्यातील कवीआनंदा ननावरे, किडगाव, अनिल लोहार लिंब, सौ जाधव मॅडम मेढा, सौ शिंगटे मॅडम मेढा, किरण जाधव मेढा, अविनाश चव्हाण फलटण, श्री नाळे सर फलटण, जयश्रीताई माजगावकर मेढा, संगिता माने सातारा, श्री माने सर सातारा, कवित्व कार सारंग इनामदार सातारा, संदिप भिंगारे सर अतीत..यांनी पावसाळी आठवण.विषयी काव्य वाचन उपक्रमात सहभाग घेऊन आपली कविता वाचून आनंद व्यक्त केला.

यावेळी प्रमुख उपस्थिती.शोभा शेडगे, कार्याध्यक्ष महात्मा गांधी वाचनालय मेढा, अशोक दिक्षित, संचालक, महात्मा गांधी वाचनालय मेढा. अंजली व सुजाता त्रिंबके सातारा, सीमा गायकवाड सातारा, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारीवर्ग,मेघा वेदपाठक, यांची होती.आभार सौ जयश्रीताई माजगावकर यांनी मानले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!