मेढा ता.जावली येथिल मुख्य बाजार चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे दिले जाणार नाव

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –
मेढा.दि.१०. जावली तालुक्यातील मेढा नगरपंचायतीची काही दिवसापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये मेढा येथिल सातारा महाबळेश्वर व पाचवड ते मेढा येथिल लक्ष्मी रोडला जोडणाऱ्या या मुख्य बाजार पेठेतील चौकाला विशेष महत्त्व प्राप्त असलेने या चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय या सभेमध्ये ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला.
या चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे,मेढा हे तालुक्याचे ठिकाण असलेने तालुक्यातील या मुख्य चौका मध्ये ब्रिटिश काळा पासून ते आज पर्यंत अनेक आंदोलने करण्यात आली आहेत.त्यामुळे या चौकाला विशेष महत्त्व प्राप्त आहे.
मेढा नगरपंचायतीच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत महत्वाच्या ठरावांना मंजुरी देण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ होते उपनगराध्यक्षा कल्पना जवळ व नगरसेवक यावेळी उपस्थित होते,तसेच मेढा नगरपंचायतीची शेवटची सर्वसाधारण सभा संपन्न झाली त्यात नगरसेवक शशिकांत गुरव यांनी मेढा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यसंस्कारासाठी ४००० रु अंत्यसंस्कार सहाय्यता निधी मिळावा असा ठराव मांडला त्याला माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी अनुमोदन दिले सर्व नगरसेवकांनी हा महत्वपूर्ण ठरावाला पाठिंबा देत बहुमताने मंजूर करण्यात आला तसेच मेढ्यातील मुख्य चौक असलेल्या बाजार चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करावे हाही ठराव नगरसेवक शशिकांत गुरव यांनी मांडला या ठरावाला माजी नगराध्यक्ष अनिल शिंदे यांनी अनुमोदन दिले व हाही ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला याशिवाय विविध विकास कामांना या सभेत मंजुरी देण्यात आली.
या सभेत नगरसेवक दत्तात्रय पवार,अनिल शिंदे,शशिकांत गुरव,विकास देशपांडे, नारायण देशमुख,द्रोपदा मुकणे,संजना सावंत,शुभांगी गोरे,गौरी पवार आदी नगरसेवकांनी विकासकामांवरील चर्चेत सहभाग घेतला
तसेच अंत्यसंस्कारासाठी चार हजार रुपये सहाय्यता निधी मिळणार असल्याने गोरगरीब जनतेची मोठी अडचण दूर होणार आहे नगरसेवक शशिकांत गुरव यांच्याकडे अनेक नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी नगरपंचायतीकडून काहीतरी निधीची तरतूद करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती त्यानुसार नगरसेवक शशिकांत गुरव यांनी सभागृहात हा ठराव मांडला व त्याला सर्वच सदस्यांनी मंजुरी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले मेढा शहर असून त्यांचे स्मरण कायम व्हावे व शिवस्मृतींना उजाळा मिळावा या हेतूने बाजार चौकाला छ शिवाजी महाराज चौक नाव देण्याचा ठरावही नगरसेवक शशिकांत गुरव यांनी मांडला या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
नगरपंचायत सभेत अंत्यसंस्कार सहाय्यता निधीचा विषय ऐनवेळच्या विषयात मंजूर करण्यात आला आहे निधी वाटपाबाबत विषय असल्याने तो विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घ्यावा लागेल व मंजुरी घेऊन त्याची अंमलबजावणी सर्व कायदेशीर बाबी पडताळून करण्यात येईल सभेत ठराव होऊन मंजुरी मिळाली आहे त्यामुळे अंत्यसंस्कार सहाय्यता निधी मिळेल पण त्याला थोडा वेळ जाणार आहे
अमोल पवार, मुख्याधिकारी
मेढा नगरपंचायत, मेढा



