घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचा फेर सर्वे त्वरित करावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा

स्टार ११ महाराष्ट्र – न्यूज युवराज धुमाळ
मेढा.दि.२२. दरे बुद्रुक ता.जावली येथील मोडकळीस आलेले दगडी घर कोसळल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील श्रीमती कुसुम नधू महामुलकर या विधवा महिला यांचा दुर्दैव्यारित्या मृत्यू झाला तसेच अन्य तीन महिला जखमी झाल्या. मृत्युमुखी पडलेल्या महिलेला घरकुल मंजूर असून पण शासनाकडून वेळेत निधी उपलब्ध झाला नाही त्यामुळे या महिलेचे घरकुल काम पूर्ण होऊ शकले नाही,त्यामुळे या मृत्युला जावळी तालुक्यातील लालफितीत अडकून पडलेला प्रशासकीय कारभार आणि शासन जबाबदार आहे.असे प्रतिपादन यावेळी शिवसनेच्या वतीने करण्यात आले.

यासंबंधी गुरुवार दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी शिवसेना जावळी तालुक्याच्या वतीने तहसीलदार राजेंद्र पोळ यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना नेहमी सामाजिक बांधीलकी समजून ८०% समाजकारण आणि २०% राजकारण यानुसार काम करते याचाच भाग म्हणून या घटनेची शिवसेनेच्या वतीने नोंद घेण्यात आली. घरकुल योजनेमधील लाभार्थीचा चुकीच्या पद्धतीने सर्वे केला आहे,तसेच घरकुल योजनेतील लाभार्थीचा योग्य प्रकारे प्राधान्य क्रम ठरवून फेरसर्वे करण्यात यावा.जावळी तालुक्यातील सर्व मंजूर घरकुल यांना त्वरित निधी मंजूर करावा . याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या दुर्देवी घटनेला जबाबदार कोण असा खडा सवाल यावेळी शिवसेनेच्या वतीने प्रशासनास विचारण्यात आला असून भविष्यात अशा घटना घडल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी शिवसेना नेते माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, जेष्ठ नेते पार्टे गुरूजी, शिवसेना तालुका प्रमुख मा.नितिन गोळे, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ धनावडे,मेढा शहरप्रमुख सचिन जवळ,सचिन करंजकर,प्रकाश गोळे,चंद्रकांत धनावडे,राजाराम आगलावे,बापू गोळे,रवी पार्टे,संजय गोळे,आनंंदा पोफळे ,आनंदा सणस ,के डी पवार,अशोक बामणे,मनोज पवार,रवि चिकने,बाळासाहेब शिर्के, शिवसेना आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.



