महाराष्ट्रसातारासामाजिक

वरोशी येथील आमराईला स्व. विजयराव मोकाशी यांच नाव देणेचे ग्रामस्थांनी केले जाहिर

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज


मेढा. दि.25. बोडारवाडी धरण कृती समीतीचे निमंत्रक स्व.विजयराव मोकाशी यांच मंगळवारी दि २० रोजी अकस्मीत निधन झाले श्री श्रेत्र माहुली सातारा येथे शुक्रवारी सावडणे विधी वेळी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले बोडारवाडी धरण होण्यासाठी तालुक्यातील सर्व राजकीय व्यक्तींनी राजकारणाचे जोडे बाजुला ठेवून सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे, विजयराव मोकाशी यांनी सुरुवात केलेले हे कार्य आपण पूर्ण करूया आणि हिच खरी त्यांना श्रदांजली असेल.

कर्तृत्ववान लोक कधी मरत नसतात ते कायम अमर असतात याच ज्वलंत उदाहरण विजयराव मोकाशी आहेत,मोकाशी कुटुंबाने घेतलेला निर्णय त्यांच्या अस्थी व राख नदीमध्ये विसर्जित न करता वरोशी येथील आमराई व शेतामध्ये झाडांना घातले मुळे आपला सदस्य झाडाचे रूपाने आपले सोबत कायम राहील हा निर्णय स्तुत्य आहे असे मत मराठा सेवा संघाचे श्रीमंत कोकाटे यांनी मांडले समाजसेवक विलास बाबा जवळ यांनी साहेबां बदलच्या आपले भावनांना मोकळ्या वाटा दिल्या बोंडारवाडी कृती समीती तर्फे राजेंद्र जाधव यांनी श्रदांजली वाहीली.

यावेळी वरोशी येथील आमराईला स्व विजयराव मोकाशी यांच नाव देणेचे वरोशी ग्रामस्थानी जाहीर केले.आमदार शशिकांत शिंदे, माजी आ. सदाशिव सपकाळ,मराठा सेवा संघाचे श्रीमंत कोकाटे, अँड विजय चव्हाण, कोल्हापूरचे, रविंद्र साळुंखे,रोहन साळुंखे,विलास बाबा जवळ पत्रकार मोहन जगताप अशोक वांगडे पत्रकार सुनिल धनावडे बोंडारवाडी कृती समितीचे सदस्य सरपंच परिषद जावळी चे पदाधिकारी तसेच वरोशी ग्रामस्थ उपस्थित होते.


स्व.विजयराव मोकाशी साहेब यांचा अस्तीकलश बोंडारवाडी धरण कृती समिती कार्यालयात ठेवणेत येणार असुन ज्यावेळी बोंडारवाडी धरण होईल त्या वेळी बोंडारवाडी धरणाचे पाण्यात या अस्तींचं विसर्जन करणेची भावना निर्णय कृती समीतीन घेतला आहे
विलास बाबा जवळ

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!