महाराष्ट्रशैक्षणिकसातारा

विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशीच स्पर्धा केल्यास यश गवसणी घालणार : शिक्षणतज्ज्ञ पूजा आठवले

पांचगणी ,ता.२५ : विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशीच स्पर्धा केल्यास यश तुम्हाला गवसणी घातल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन शिक्षण तज्ज्ञ पूजा आठवले यांनी केले.
दापवडी ता. जावळी येथील दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप आणि शुभचिंतन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती आठवले बोलत होत्या.

दापवडी: पाहुण्यांकडून भेट वस्तू स्वीकारताना दहावीचे विद्यार्थी

यावेळी उद्योजक राजू शिंदे, कृषितज्ज्ञ संतोष रांजणे, तज्ञ शिक्षक बापुराव रांजणे, संस्थेचे सचिव डी. के. जाधव, दापवडीचे सरपंच महादेव रांजणे, माजी सरपंच संतोष रांजणे, संस्थेचे सचिव डी. के. जाधव , संचालक बी.व्ही.शेलार, दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, मुख्याध्यापक श्री. पुंडलिक कांबळे, सौ. सावंत मॅडम विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी कॉपी न करता परीक्षेला सामोरे जावे आयुष्याच्या परीक्षेत आपणाला कुठंही कॉपी करता येत नाही त्यामुळे कॉपी न करता मिळवलेले यश कायम टिकते असे राजू शिंदे यांनी सांगितले.डी के जाधव म्हणाले एखादे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्या क्षेत्रात झोकून देणे अगदी वेडे झाले तरच यश मिळणार आहे हे विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवावे.
संतोष रांजणे म्हणाले विद्यार्थ्यांनी परीक्षा पुरता विचार न करता पुढच्या भविष्याचा विचार करा आणि मगच परीक्षेला जा भविष्यात वाचन करा तरच तुम्ही भविष्यात मोठे होणार आहात.

बापुराव रांजणे म्हणाले आदर्श विद्यार्थी घडताना पालकांनी दिलेली शिस्त आणि शिक्षकांनी दिलेल शिक्षण मुलांनी आत्मसात करावे .यावेळी आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर यावेळी शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी संतोष रांजणे यांनी रोख रक्कम दिली तर राजू शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पेन भेट देवून दहावीत प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना रोख रक्कम जाहीर केली.
मुख्याध्यापक श्री कांबळे यांनी प्रास्ताविक केले. नितीन घाडगे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रतिभा जंगम यांनी आभार मानले.
सोबत फोटो आहे
दापवडी: पाहुण्यांकडून भेट वस्तू स्वीकारताना दहावीचे विद्यार्थी

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!