युवराज धुमाळ
मेढा. दि.१९ जावली तालुक्यातील मेढा येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची यात्रा येत्या सोमवारी असल्याची माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष सचिन करंजेकर यांनी दिली.
मेढा ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची यात्रा होत असून ही यात्रा दि.२० व २१ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे मेढा यात्रा कमिटीने या वेळी महाराष्ट्र राज्य पुरस्कार मानकरी कै.तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा आयोजित केला आहे.
या यात्रेत आकर्षण असणारे लहान मुलांकरीता झोपाळे, पाळणे तसेच विविध साधनसामुग्री उपलब्ध होणार असून तब्बल 2 वर्षानी कोरोनाचे नियम पाळून हि यात्रा भरविणेत आली असल्याने यात्रा व्यवस्थित रित्या पार पाडण्याचे संकेत यात्रा कमिटी अध्यक्ष व पदाधिकारी यांनी दिली.



