महाराष्ट्रमुंबई व नवी मुंबईसामाजिक

छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र रेल्वे रूळाच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीवरून हटविले

स्टार११महाराष्ट्र न्युज नेटवर्क

नवीमुंबई.दि.२५ अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र रेल्वे रूळाच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीवर काढून छत्रपती शिवरायांची काही अंशी विटंबनाच नवी मुंबई महानगरपालिका व सिडकोच्या कंत्राटदाराकडून करण्यात आली होती.
भविष्यात या तैलचित्राची देखभाल होणे शक्य नव्हते आणि त्यामुळे काही दिवसांनी यावरून वाद होण्यापेक्षा आगोदर च याबाबत आवाज उठवणे गरजेचे होते.

ऐरोली विधानसभा समन्वयक श्री महेंद्र चिकणे

काल या घटनेविरूद्ध शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ऐरोली विधानसभा समन्वयक महेंद्र श्रीरंग चिकणे यांनी आवाज उठवला होता.भविष्यात होणाऱ्या विटंबनेचा धोका लक्षात घेऊन श्री चिकणे यांची बाजू ऐकून घेवून संबंधित यंत्रणेने ते तैलचित्र त्वरित हटवले आहे. शिवसैनिकांच्या दणक्याने या प्रशासनाला जाग आली आणि हे काम थांबवले व संभाव्य धोका टाळला.


या प्रश्नासाठी संतोष शेळके, शिवसेना उपशाखाप्रमुख अविनाश गोळे, शिवसेना विभागप्रमुख कोपरखैरणे मधुकरराव राऊत साहेब, किरण(दाजी) हिनुकले (शिवसेना विभागप्रमुख, कोपरखैरणे). सर्व सहकात्यांच्या मदतीने चिकणे यांनी हा प्रश्न धसास लावला याबद्दल या सर्वांचे चिकणे यांनी आभार मानले परंतु या दणक्याबद्दल श्री चिकणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!