महाराष्ट्रसातारासामाजिक

२३ मार्च रोजी बोंडारवाडी धरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार ठिय्या आंदोलन

स्टार११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

केळघर दि.२७ जावली तालुक्यातील ५४ गावांसाठी महत्त्वाचा असलेला बोंडारवाडी धरणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवत आहे.श्रमिक मुक्ती दल व धरण कृती समितीच्या वतीने प्रश्न मार्गी लागेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५४ गावांच्या वतीने २३मार्च रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्रमिक मुक्तीदलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.

पाणी नसल्याने खेड्यातील युवकांनी अर्थार्जनासाठी शहरांची वाट धरली त्यामुळे गावे ओस पडत आहेत. हे चित्र बदलले पाहिजे. दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाने संघर्ष करून यश मिळवले. त्याचप्रमाणे बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी ५४ गावांतील ग्रामस्थांना सोबत घेऊन निर्णायक लढा उभारणार आहे. धरण मिळवू अन्यथा बलिदान करू, या ध्येयाने प्रेरित होऊन दि. २३ मार्चला आयोजित केलेल्या ठिय्या आंदोलनात ५४ गावातील मुलां-बाळांसह सर्वांनी उपस्थित राहावे. हुतात्मा भगतसिंह यांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे त्याचप्रमाणे ५४ गावांतील जनतेने या आंदोलनात सहभागी होण्यासाठी व्हावे असे प्रतिपादन डॉ.भारत पाटणकर यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रशासनासोबत दि.५ नोव्हेंबर रोजी सातारा येथे झालेल्या बैठकीत प्रस्तावित बोंडारवाडी धरणात पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देऊ, असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, यावर ठोस कार्यवाही न झाल्याने हे आंदोलन होईल. त्यासाठी गावोगावी बैठका घेणार आहे.बोंडारवाडी धरणासंदर्भात नांदगणे येथे झालेल्या बैठकीत विजयराव मोकाशी बोलत होते.
यावेळी कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, राजाराम ओंबळे, राजेंद्र धनावडे, आदिनाथ ओंबळे, विजयराव सावले, एकनाथ सपकाळ, विनोद शिंगटे वेळी भाऊशेठ उभे, शांताराम ओंबळे, जगन्नाथ जाधव, नामदेव कासुर्डे, अशोक पार्ट, महादेव ओंबळे, मंदाकिनी भिलारे, मारुती चिकणे, संतोष कदम, विठ्ठल चिकणे, सुरेश कासुर्डे, यशवंत बेलोशे सागर पार्टे, प्रितम पार्टे,अमोल आंग्रे,विद्या सुर्वे, वैशाली शेलार,धनश्री शेलार यांच्यासह ५४ गावातील महिला, पुरुष, युवककांसह मुंबई व पुणेस्थित युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!