स्टार११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
केळघर दि.२७ जावळी तालुक्यातील गवडी तर्फ मेढा येथे आज आरोग्य उपकेंद्रात पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले.पल्स पोलीओ लसीकरण मोहिम ही अत्यंत व्यापक व महत्वाकांक्षी योजना आहे. या मोहिमेंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना गवडी येथील उपकेंद्रावर लसीकरणाची मोहीम यशस्वी झालेचे प्रभारी सरपंच राजु खुडे यांनी प्रतिपादन केले.
पाच वर्षाखालच्या सर्व बालकांना पोलिओ डोस दिला जातो.पोलिओ (बालपक्षाघात) म्हणजे विषाणूमुळे येणारा लुळेपणा. हा बहुतकरून दोन वर्षाखालील मुलांना होतो. काही गरीब देशांत हा रोग टिकून आहे. पाच वर्षे वयापर्यंतच्या लस न दिलेल्या सर्व मुलांना- विशेषत पावसाळयात याच्यापासून धोका असतो. हा आजार झालेली ८० टक्के मुले एक ते दोन वर्षे गटातील असतात. लसिकरणासाठी आपल्या बाळाला घेऊन आलेल्या महिलांना प्रभारी सरपंच राजु खुडे यांनी व आरोग्य सेविका यांनी माहिती दिली.या शिवाय ठरल्याप्रमाणे प्रत्येक बालकाचे लसीकरण करायचे असतेच. यात जन्मल्यावर लगेच एक डोस आणि त्रिगुणी लसीबरोबर एकेक डोस दिला जातो. या नियमित लसीकरणातून ८०% बालकांना सुरक्षा-कवच मिळावे असा प्रयत्न आहे.
या लसीकरणाच्या कार्यक्रमास प्रभारी सरपंच राजु खुडे,डॉ.केदार कुलकर्णी आरोग्य सेविका आसमा शेख, गीतांजली अडागळे, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व महिला कार्यक्रमास उपस्थित होते.



