Uncategorized

गाळदेव येथे पांडवकालीन गाळेश्वर मंदिरात उद्या महाशिवरात्री मोठ्या उत्साहात होणार साजरी

गाळदेव येथे पांडवकालीन गाळेश्वर मंदिरात उद्या महाशिवरात्री मोठ्या उत्साहात होणार साजरी

स्टार ११ महाराष्ट्र न्युज नेटवर्क / संदिप गाडवे

महाबळेश्वर दि. २८  गाळदेव येथे पांडव कालीन गाळेश्वर मंदिरात महाशिवरात्री गाळेदव ता जावली येथे मंगळवार १ मार्च रोजी गाळेश्वर मंदिरात शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करून महाशिवरात्री साजरी केली जाते.

गाळदेव येथे गाळेश्वराचे मंदीर हे ४५० वर्षापूर्वीचे पांडवकालीन मंदीर आहे मंदिराचे सभोवताली खुप वनराई आहे. गावचे जेष्ठ नागरीक व माजी सरपंच श्री शंकर सदु जंगम यांनी मंदिराविषयी माहीती देताना म्हणाले ४५० वर्षापुर्वी एक गाई मंदिरात यायची व महादेवाचे पिंडीवर दुधाच्या धारे चा अभिषेक करत असे . रोज येणारी गाई पिंडीवर दुधाची धार सोडून पुढे जात असे . रोज येणारी गाई कुठे जाते हे पाहणेसाठी एक गुराखी गायीचे पाठी जायचा .परंतु ती गाई दुधाची धार सोडताना फक्त दिसायची पण पुढे ती कुठे जायची हे कोणालाच दिसले नाही . त्यानंतर काही वर्षांनी अचानक कर्नाटकातुन एक स्वामी आला व महादेवाची पुजा करू लागला . हाच स्वामी गाळदेव ग्रामस्थांचा मुळ पुरुष म्हटले जाते.

आज गाळदेव हे फक्त २५/३० घराचे असुन लोकवस्ती २२५ ते ३०० आहे गावचे पूर्व दिशेस एक पुरातन गणेश मंदीर होते काही वर्षापूर्वी या मंदिराचा जिर्णोधार करून ग्रामस्थांनी लोक वर्गणीतून नविन मंदिर उभे केले याच मंदिरा शेजारी पाण्याचा झरा आहे. अस म्हटल जात कि पाच पांडवांपैकी भिमाने या ठिकाणी फावडे मारून एक कुंड तयार केले होती तोच हा झरा. गाळेश्वराचे मंदिर हे पूर्ण काळ्या दगडी खांबाचे आहे २० वर्षापुर्वी या मंदिराच्या काही भागाचे काम ग्रामस्यांनी लोकवर्गणीतून केले या मंदिरात धारेश्वरचे महाराजांकडून लिंग दिक्षा घेतली जाते या मंदिरात बिड जिल्ह्यातुन कपिलधार क्षेत्रातुन मन्मथ स्वामींची मुर्ती आणून स्थापना केली. तसेच काशी जगद्गुरू चंद्रशेखर महाराजांनी काशी विश्वेश्वराची मुर्ती आणून धारेश्वर महाराजांचे हस्ते त्या मुर्तीची स्थापना केली फेब्रुवारी महीण्यात प्रतिपदेला पारायण सोहळा सुरु होतो व मन्मथ स्वामींचे जयंती दिवशी पारायणाची समाप्ती होते महाशिवरात्रीला सकाळी १२ वाजता काशीविश्वेश्वरांची जयंती साजरी केली जाते पुर्वी कच्चा रस्ता होता आता पक्का डांबरीकरण रस्ता आहे. श्री क्षेत्र गाळदेवला सातारा वरून कास मार्गे, तसेच महाबळेश्वर मार्गे व सातारा – मेढा – वागदरे मार्गे जाता येते दरवर्षी महाशिवरात्रीला परमेश्वर पांडुरंगाचे पंढरपुर प्रमाणे भाविक दर्शना साठी जमतात.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!