सातारासामाजिक

सातारा पंचायत समिती मधील,मी माझ्या पगारावर समाधानी, “त्या” पाटीची जोरदार चर्चा ,



स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——जितेंद्र जगताप

सतीश बुद्धे यांच्या “त्या” पाटीची जोरदार चर्चा ,सातारा पंचायत समिती प्रामाणिक लोकसेवक आल्याने समाधान

सातारा. दि.२३. सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी आपल्या दालना बाहेर मी माझ्या पगारावर समाधानी आहे अशा आशयाची पाटी लावल्याने पंचायत समितीत कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणतेही शासकीय काम थेट व्हावे सुलभ व्हावे आणि विनामूल्य व्हावे हीच या पाठीमागची अपेक्षा आहे असे स्पष्ट धोरण बुध्दे यांनी स्वीकारले आहे मी काही कारणास्तव बाहेरगावी असल्यास या क्रमांकावर नावासह संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोणत्याही शासकीय कार्यालयात काम वेळेवर होत नाही म्हणून सर्वसामान्यांना हजार वेळा खेटे मारावे लागतात . त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाला सेवा हमी कायदा अमलात आणावा लागला.

सातारा पंचायत समितीमध्ये नव्याने हजर झालेले गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी सर्वसामान्यांच्या कामाची गांभीर्याने दखल घेतली आहे येथील कोणतेही काम सुलभ आणि विनाशुल्क व्हावे असा स्पष्ट संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!