धार्मिकमहाराष्ट्रसातारा

ऐतिहासिक वारसा असलेल्या मरडेश्वर देवस्थानच्या विकासासाठी प्रयत्न करणार

स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

केळघर.दि.०२ जावळी तालुक्यातील मरडेश्वर हे पांडवकालीन ऐतिहासिक महादेवाचे स्वयंभू स्थान आहे. निर्सगाच्या सानिध्यात वसलेल्या या देवस्थानच्या विकासासाठी निधी मिळन्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून प्रयत्न करू अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दिली.

          महाशिवरात्री निमित्त मरडेश्वर देवस्थान येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जयदीप शिंदे, मच्छिंद्र क्षीरसागर, समीर आत्तार, विकास धोंडे, शिवाजी मर्ढेकर, संजय शेलाटकर,बबन पार्टे, सुनील जाधव, भरत आढाव, शांताराम पार्टे, महादेव शेडगे, प्रकाश साळुंखे, मारुती ढेबे यांची उपस्थिती होती.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रांजणे यांनीही या ऐतिहासिक देवस्थानला जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.मरडेश्वर देवस्थान हे पांडवकालीन परंतु दुर्लक्षित असल्येल्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ चार वर्षांपासून महाशिवरात्री चा उत्सव करत आहेत. महाशिवरात्री निमित्त येथे अभिषेक,महाआरती, कीर्तन, भजन, धनगरी ओव्या, हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!