स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क /संदिप गाडवे
- केळघर दि.०२ महाबळेश्वर तालुक्यातील लाखवड गावचे सुपुत्र श्री.आबा संकपाळ यांचा शिवसेना युवा सेना नेते श्री विशाल सकपाळ व महाबळेश्वर तालुका प्रमुख श्री.संजय शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
शिवसेनेची वाटचाल हि समाजाभिमुख राहिली असून वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे यांचे नेतृत्व आणि महाराष्ट्रातील तमाम युवा वर्गाचे सक्षम नेतृत्व युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते तथा पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री मा.ना.श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेला महाराष्ट्राचा विकास तसेच माननीय माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांच्या कार्याने प्रेरित होऊन आज शिवसेनेत प्रवेश केलेल्या श्री.आबा संकपाळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधून भगवा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर यश मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे याप्रसंगी पक्षप्रवेश केलेल्या या सर्वांनी स्पष्ट केले. आपणा सर्वांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्याचे काम योग्यप्रकारे होईल त्यांबरोबर महाबळेश्वर तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष बळकटीकरणाचे आणि पक्ष विस्ताराचे काम अविरतपणे घडत राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करत सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन करत भावी राजकीय आणि सामाजिक वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी श्री.गणेश उतेकर,आनंद धनावडे सरपंच तापोळा,राम सकपाळ सरपंच वेळापूर,शंकर कदम रामेघर, किसन पवार सरपंच लाखवड,प्रकाश जाधव विभाग प्रमुख तुकाराम जाधव सौंदरी,चंदर जाधव,बबन सकपाळ सरपंच अहिर,सुनील नलावडे सरपंच वाळणे,गणेश सकपाळ,मानाजी सकपाळ वेंगळे, महादेव आगोंडे गोगवे,लक्ष्मण कुंभार,लक्ष्मण कदम खांबील,बाळकृष्ण माने,बबन उत्तेकर,राजेश उत्तेकर वानवली शिवसैनिक उपस्थित होते.



