राजकीयसातारा

रिटकवली ता.जावली येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आगमन

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——


मेढा.दि.०९. केंद्र व राज्य सरकारच्या प्रमुख योजनांची माहिती व विविध शासकीय योजनांचे लाभ गावोगावी लोकांपर्यत पोहोचव्यात या उद्देशाने देशभरात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित केली असून आज संकल्प यात्रेच्या वाहनाचे आगमन आज रिटकवली ता. जावली या ठिकाणी झाले.


शासनाच्या योजनांची माहिती नागरिक, विद्यार्थी, महिला,  शेतकरी व इतर गरजू घटकांना व्हावी, त्यांना या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी राज्यभरात २८ नोव्हेंबर २०२३ ते दि. २६ जानेवारी २०२४ पर्यंत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ चे नियोजन करण्यात आले आहे. हा ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ चा संकल्प असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी दिली.विकसित देशाच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


तसेच या ठिकाणी ” प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे ” आरोग्य शिबीर व उज्वला योजनेच्या स्टॉलच्या माध्यमातून लाभार्थी शोधण्यात आले. लाभार्थी बंधू-भगिनींशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. विकसित भारताची शपथ घेतल्यानंतर उपस्थित लाभार्थ्यांना विविध योजनांच्या दाखल्यांसह आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात आले.


यावेळी सातारा भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, जि.प. सातारा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमारे तहसीलदार हणमंत कोळेकर, गटविकास अधिकारी मंगेश कुचेकर, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, तालुका कृषी अधिकारी घोरपडे, विस्तार अधिकारी अमित पवेकर, विस्तार अधिकारी दिगंबर सुरवसे, कृषी विस्तार अधिकारी प्रशांत शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहिते सो, भाजप सातारा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे, भाजप जावळी तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे, सातारा जिल्हा ओबीसी सेल महिला अध्यक्षा गीताताई लोखंडे, मा.नगरसेवक विकास देशपांडे, महिला मोर्चा अध्यक्षा वैशालीताई सावंत,ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सुतार, पंचायत राजचे भानुदास ओंबळे, किरण भिलारे, विनोद वेंदे, रोहित नवसरे, दत्ता शिंदे, ग्रामसेवक संजय जूनघरे, रिटकावली सरपंच शारदाताई मर्ढेकर,माजी सरपंच सचिन दळवी, सर्जेराव मर्ढेकर, तुकाराम मर्ढेकर, लक्ष्मण सुतार, मोहन पवार, लक्ष्मण सुतार, नामदेव मर्ढेकर, सुनिल मर्ढेकर, ग्रामस्थ तसेच आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, विविध लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संकल्प यात्रेत सहभाग नोंदविला, उपक्रमांची माहिती घेतली आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभही घेतला.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!