क्रीडा

जेएमसीसी चषकाचा मानकरी ठरला लूमनेखोल संघ.

स्टार ११महाराष्ट्र / कोळघर प्रतिनिधी


कोळघर.दि.२८.बीसीसीए कास पठार सातारा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जननीमाता ग्रामविकास मंडळ कोळघर मुंबई व जननी माता क्रिकेट क्लब कोळघर ता.जावली यांचे वतीने जेएमसीसी चषक २०२२ पर्व दुसरे या स्पर्धेचे आयोजन श्री कृष्णा दिवा कोळीवाडा ,ऐरोली सेक्टर २० मुंबई या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचे बक्षीस सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यावतीने रोख रुपये २५ हजार ,द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रवींद्र बाबाजी म्हात्रे नगरसवेक व मंगेशजी संकपाळ शिवसैनिक यांचेकडून रोख १२ हजार ५०० रुपये तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस कै. नर्मदा जाधव यांच्या स्मरणार्थ अंकुश पांडुरंग जाधव व संतोष पांडुरंग जाधव यांचेकडून रोख ७ हजार ५०० रुपये ठेवण्यात आले होते.ही स्पर्धा दोन दिवस खेळविण्यात आली व याचे पूर्ण प्रक्षेपण युट्युब लाईव्ह ने देखील दाखवण्यात आले.

या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो लूमनेखोल संघ,द्वितीय क्रमांक पिसाणी,तृतीय क्रमांक मुनावळे या संघांनी पटकाविला.उत्कृष्ट फलंदाज अवधूत भोसले,उत्कृष्ट गोलंदाज तेजस घोरपडे,मालिकावीर अतुल गोगावले,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विश्वनाथ शिंदे,सिक्सर किंग अवधूत भोसले यांनी इतर बक्षिसे पटकाविली.स्पर्धेतील इतर बक्षिसांसाठी विजय शिंदकर,किशोर पवार,लक्ष्मणदादा जाधव ,गोविंद जाधव,मंगेश जाधव,बजरंग सकपाळ,प्रकाश शिंदे,दत्ता शिंदे,रमेश शिंदे,भरत शिंदे,कृष्णा शिंदे,उज्वल जाधव ,कु.राघव पठाडे,गणेश कदम ,शक्ती म्हात्रे,नितीन चिकणे,अशोक शिंदे,राजेश शेलार,रोहन शेलार,नागेश पवार सोपान मोरे,राकेश साळुंखे,रमेश पवार,दीपक शिंदे,सागर शेलार,विजय दानवले,पवन टूर्स अँड ट्रॅव्हल्स,गणेश शिंदे,हरीश शिंदे,गोविंद शिंदे,संतोष संकपाळ,राम जुनघरे,दिनेश जाधव ,गोवा गँग,विकास शिंदे. सर्वांनी खूप मोलाचे सहकार्य केले.समालोचक म्हणून निवृत्ती शिंदे व विनोद जाधव यांनी काम पाहिले.

ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी जननी माता ग्रामविकास मंडळ कोळघर व ग्रामस्थ मंडळ कोळघर यांनी खूप मेहनत घेतली सर्व हसभागी संघाचे क्रिकेट क्लब कोळघर याचे वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!