शैक्षणिकसातारा

शिक्षणाबरोबरच ग्रामिण भागातील जीवन प्रणाली उंचावण्यासाठी प्रयत्न करणार

युवराज धुमाळ

मेढा दि.१३ जावलीच्या डोंगरकपारीत राहाणाऱ्या बांधवांच्या शिक्षणाबरोबरच , जीवन प्रणाली उंचावण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विधान परिषदेचे आमदार शशिकांतजी शिंदे यांनी दिले.

जयवंत प्रतिष्ठान हुमगांव संचलित न्यू इंग्लिश स्कुल , कुसुंबीमुरा या शाळेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन समारंभा प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून आ. शशिकांत शिंदे बोलत होते.

आ. शशिकांत शिंदे पूढे म्हणाले, डोंगर कपारीतील मुले, मुली शिक्षणापासून वंचित राहात होती. म्हणून जयवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून मेढयात उच्च शिक्षणाची सोय केली तर कसुंबीमुरा या डोंगरकपारीतील मुलांसाठी ही विद्यालय सुरु केले. मी या तालुक्याचा आमदार असताना डोंगर कपारीतील गांवागांत रस्ते पोहोचवले .जग चंद्रावर, मंगळावर पोहोचले पण आज अनेक खेडी पाडी विकासा पासून कोसो दुर आहेत. जावलीचे प्रेम अद्याप माझ्यावर आहे . आणि ते आहे म्हणूनच माथाडी कामगाराचा मुलगा आमदार , मंत्री झाला. त्याचा पाया येथील जनतेनेच रचला .पवार साहेब आणि अजितदादा पवार यांनी संधी दिली याचा मला सार्थ अभिमान आहे. आपल्या मुलांच्यात गुणवत्ता आहे . त्यामुळे आपली मुले माथाडी कामगार नव्हे तर चांगली अधिकारी होण्याची स्वप्न पाहिली पाहीजेत. येथील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी निरंजन किर्लोस्कर आणि त्यांच्या कंपनीने हायस्कुलची सुसज्ज इमारत बांधून दिल्याबद्धल आ. शशिकांत शिंदे यांनी धन्यवाद मानले.

फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रा .लि.कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक निरंजन किर्लोस्कर यां वेळी बोलताना म्हणाले, या भागातील मुलांसाठी काहीतरी करण्याची संधी उपलब्ध करून त्याबद्धल आ. शशिकांतजी शिंदे आणि सहकाऱ्यांचे धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहेत. या शाळेतून १० पास होवून पूढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना दत्तक घेणार असल्याचे घोषीत करुन , पालक घरात कसे वागतात त्याचा परिणाम मुलांच्यावर होतो. सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम पालकांचे आहे. भविष्यातही या शाळेस जी जी मदत करता येईल ती निश्चित करू असे सुचित केले.

फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रा. लि. कंपनीचे अध्यक्ष संजय कुलकर्णी म्हणाले, काही गोष्टींना पाठपुरावा महत्वाचा असतो. शिंदे साहेबांनी तो केला . म्हणून आज सुंदर अशी ३मारत उभी राहीली. शिंदे साहेबांसारखा नेता या तालुक्यात आहे . हे येथील जनतेचे भाग्य आहे . विद्यार्थी , विद्यार्थीनी शिकल्या पाहीजेत यासाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले.

जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती अमितदादा कदम यांनी आपल्या भाषणातून किर्लोस्कर व त्यांच्या कंपनीने केलेल्या मदतीबद्धल धन्यवाद मानले.

या प्रसंगी माझी विद्यार्थी समिर झोरे, योगेश मोरे यांनी आपल्या मनोगतातून आ. शिंदे, व संस्थेचे धन्यवाद मानले.

प्रारंभी फ्लीटगार्ड फ्लिटर्स प्रायव्हेट लि. पुणे यांचे वतीने सी एस आर फंडातून बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन किर्लोस्कर , आ. शशिकांतजी शिंदे यांचे हस्ते करण्यात आले .या प्रसंगी .कंपनीचे अध्यक्ष संजय कुलकर्णी , जयवंत प्रतिष्ठानच्या सचिव वैशाली शिंदे, जि. प. चे शिक्षण. अर्थ समितीचे माजी सभापती अमितजी कदम , यशवंतराव चव्हाण स्मारक समिती पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष सुनिल जाधव, कपनीचे सि. मॅनेजर अभिमन्यू गिरमकर , आ. शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे, आदी मान्यवर उपस्थीत होते.

या प्रसंगी बुवासाहेब पिसाळ, विठ्ठलराव देशमुख, प्रकाश कोकरे, विठ्ठल पवार, सुरेश पार्टे , नारायण शिंगटे , शिवाजी देशमुख, साधू चिकणे, सुनिल देशमुख , अतिष कदम, अरविंद जवळ , राम कदम, इम्रान आतार, निवृत्ती मोरे, नवनाथ वेंदे, दादु सुर्वे, आदी मान्यवरासह आमदार कॉलेजचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी , कुसुंबी मुरा परिसरातील विविध गांवचे ग्रामस्थ , पालक अस्थीत होते.

उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे , प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीरंग महामुलकर , सुत्रसंचलन प्रा . गायत्री जाधव तर आभार चिकणे मॅडम यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!