
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
मेढा. दि.०८.सातारा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय बाल क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळघर येथील विद्यार्थिनी कुमारी जान्हवी राजेंद्र पार्टे हिचा 400 मीटर धावणे या क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला.
जान्हवी हिने मिळवलेल्या या उज्वल यशाबद्दल जावली तालुका गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे,माजी विस्तार अधिकारी श्रीमती कल्पना तोडरमल केंद्रप्रमुख हंबीरराव जगताप, केळघर शाळेचे मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षक,मार्गदर्शक तसेच पुनवडी ग्रामस्थ,नेहरु युवा मंडळ,सरपंच उपसरपंच आदींनी जान्हवीचे अभिनंदन केले.



