स्टार११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर दि.२७ आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठी ही जगातील १०व्या क्रमांकाची भाषा असून या भाषेला समृद्ध व सशक्त करण्यासाठी समस्त मराठी जणांनी अभिनिवेश विसरून आपल्या मातृभाषेच्या प्रगतीसाठी पुढे यावे, असे आवाहन महाबळेश्वर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत खुरासणे यांनी केले.
प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बस स्थानकाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. उपस्थित प्रवाशांचा सत्कारही उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.
आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाबळेश्वर बस स्थानकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आगार व्यवस्थापक नामदेवराव पतंगे, सहायक वाहतूक अधीक्षक निलप्रभा पाटील,जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पंडीत देशमुख,ज्येष्ठ पत्रकार विलास काळे,दीपक वरपे,मनोज ताथवडेकर गोपाळ लालबेग ,वाहतूक नियंत्रक प्रदीप बाबर, महादेव धनावडे, कुमार बेलोशे, प्रशांत मिसाळ आदींची उपस्थिती होती. प्रारंभी नामदेवराव पतंगे यांनी मराठी भाषा दिनाची माहिती दिली व महादेव धनावडे यांनी आभार मानले.



