स्टार११महाराष्ट्र – युवराज धुमाळ
केळघर दि.२६ – गुरुशालामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मॅथस् ऑलिम्पियाड परीक्षेत श्री भैरवनाथ विद्यामंदिरच्या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. याबद्दल विद्यालय व ग्रामस्थांच्या वतीने त्याचा गुणगौरव करत सत्कार केला.

विद्यालयात इयत्ता 8 वी मध्ये शिकणारा विद्यार्थी आयुष पवनकुमार परदेशी याने गुरुशाला मॅथस् ऑलिम्पियाड परीक्षेत 85 टक्के गुण मिळवून देशात 344 वा रँक तर राज्यात 198 वा रँक मिळविला.गुरूशाला ही संस्था देशभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करत असते. त्याचाच भाग म्हणून मार्च महिन्यात देश स्तरावर मॅथ्स ऑलिम्पियाड आयोजित केली होती. या स्पर्धेत देशभरातील शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक वायदंडे डी.एच तसेच शाळा व्यवसथापन समिती व स्थानिक स्कूल कमिटी मार्फत आयुष परदेशी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले आहे. संपूर्ण पंचक्रोशीत या विद्यार्थ्याचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
यावेळी स्कूल कमिटी सदस्य मोहनराव कासूर्डे, राजेंद्र गाडवे, सरपंच रवींद्र सल्लक, बबन श्रीपती बेलोशे (पाटील), शिवराम बेलोशे, तुकाराम धनावडे, अंकुश बेलोशे, श्रीपती बेलोशे, पवन परदेशीआदी ग्रामस्थ उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वायदंडे सर तर सूत्रसंचालन देवकर सर यांनी केले.



