महाराष्ट्रसातारासामाजिक

२२ गाव प्रीमियर लिगचा मानकरी ठरला आरोही किंग्ज संघ. जि.बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांचे हस्ते बक्षीस वितरण.

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बामणोली.दि.०४.कास बामणोली कोयना विभाग ३८ गावातील मानाची समजली जाणारी २२ गाव प्रीमियर लीग ही स्पर्धा पावशेवाडी येथील भैरवनाथ मैदानावर आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत एकूण आठ संघानी सहभाग घेतला होता सदर स्पर्धा १ ते ३ मे या दरम्यान खेळवण्यात आली.या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आरोही किंग्ज या अंधारी येथील सागर शेलार यांच्या संघाने पटकावले तर द्वितीय पारितोषिक उपविजेता संघ विराज ११ या कास येथील बजरंग किर्दत यांच्या संघाने पटकावले.

मालिकावीर राकेश शिंदकर बामणोली,उत्कृष्ट फलंदाज निवृत्ती शिंदे कोळघर,उत्कृष्ट गोलंदाज सुरेश शिंदे कोळघर,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निवृत्ती शिंदे कोळघर,नवोदित खेळाडू चंद्रकांत कदम चोरगे उंबरी अशी पारितोषिक देण्यात आली.प्रथम क्रमांकासाठी रोख ५५,५५५ रुपये व चषक ,द्वितीय क्रमांकासाठी ३३,३३३ व चषक अशी बक्षिसे देण्यात आली.जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.बोलताना रांजणे म्हणाले या कोयना विभागात राज्य तसेच देश पातळीवर खेळणारे खेळाडू तयार होण्याची क्षमता आहे आणि एक दिवस या भागातील खेळाडू नक्की राज्य व देशपातळीवर खेळेल यात अजिबात शंका नाही.कास बामणोली भागात राजकारण न करता आपण सर्वांनी मिळून जास्तीत जास्त समाजकारण कसे करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. भागातील विकास कामे होतच राहतील. पण आपण सर्वजण विकासाच्या मागे म्हणजे आ. शिवेद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठीशी कायम उभे रहाल यात अजिबात शंका नाही.

              यावेळी भागातील कार्यकर्ते राम पवार,यशवंत आगुंडे,राजेंद्र संकपाळ,सदाभाऊ शिंदकर, ,डॉ.हरीश साळुंखे ,विजय पवार,सुभाष पवार,आनंद जाधव,दीपक पवार, रविंद्र शेलार,तानाजी आगुंडे,सखाराम साळुंखे, एन डी कांबळे,दत्ता शिंदे यासह २२ गाव प्रीमियर लीग कमिटीचे बाळू पवार,नितीन सुर्वे,सागर पवार,निवृत्ती शिंदे,संतोष साळुंखे,संदीप जांभळे,सुभाष जाधव,किरण भोसले,दीपक साळुंखे,राकेश यांचेसह २२ गावातील खेळाडू ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!