मी मराठी भव्य नाईट बॉक्स अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आंबेघर तर्फ मेढा येथे आजपासून आयोजित

केळघर.दि.०१.आ.श्री.छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले पुरस्कृत मी मराठी चषक २०२२ मी मराठी सेवाभावी संस्था (महाराष्ट्र),श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आंबेघर, ग्रामस्थ मंडळ आंबेघर यांच्या संयुक्त विद्यमाने मी मराठी बॉक्स नाईट अंडरआर्म स्पर्धा, १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आंबेघर तर्फ मेढा येथे दिनांक ०१ मे २०२२ पासून सुरु होणार आहेत.
आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०२२ ते शुक्रवार ४ मे २०२२ रोजी भव्य नाईट अंडर आर्म क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व इच्छुक संघांनी स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धेची शोभा वाढवावी असे प्रतिपादन मी मराठी सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य चे संस्थापक श्री प्रदिप शेलार यांनी यावेळी केले.
स्पर्धेतील आकर्षक बक्षिसे:प्रथम पारितोषिक: २५,०००/- द्वितीय पारितोषिक: १५,०००/- तृतीय पारितोषिक: ९०००/- चतुर्थ पारितोषिक: ५०००/- उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर: आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.
ग्रामस्थ मंडळ आंबेघर,जय हनुमान क्रिडा मंडळ आंबेघर,ACC क्रिकेट क्लब आंबेघर,ओम साई क्रिडा मंडळ गणेश मित्र मंडळ,आदर्श एकता क्रिडा मंडळ बोलाईदेवी क्रिडा मंडळ,शिवशक्ती मित्र मंडळ,रांजणे प्रतिष्ठान आंबेघर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे नियम व अटी:पंचांचे निर्णय अंतिम राहतील,सामना बरोबरीत सुटल्यास कम्पलसरी चेस राहील,सामने वेळेत सुरु होतील संघांनी वेळेच्या अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे,स्पर्धेत फेकी गोलंदाजाला पूर्णपणे बंदी असेल,सामन्यांचे सर्व अधिकार मंडळाकडे राहतील.सर्व सामने नियमानुसार खेळवण्यात येतील,
स्पर्धेचे स्थळ आशिलमाल मैदान आंबेघर, ता.जावली, जि. सातारा असून पुढे दिलेल्या नंबर वर संपर्क करा अवि शेलार 9702302601 सुरज शेलार 8007723971 किरण शेलार 9075665989अमोल शेलार 7039216006 समीर शेलार8422973505 विनोद जाधव 8698099281.प्रथम नोंद होणाऱ्या संघांना स्पर्धेत प्राधान्य देण्यात येईल.



