महाराष्ट्रशैक्षणिकसातारा

कासवंड येथे शालेय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – संजय वांगडे
कुसुंबी.दि.०५.कासवंड ता. महाबळेश्र्वर येथील  जि.प.प्राथमिक शाळेच्या वतीने आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला होता.

शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मा.श्री.गणपत पवार(सर) यांच्या प्रयत्नातून वड,पेरू,निंबोनी व कडूनिंबाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमाची सुरूवात वृक्षदिंडीने करण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृतीच्या घोषणा देऊन जनजागृती केली. शाळेचे मुख्याध्यापक श्री.भाऊसाहेब दानवले गुरूजी यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांना वृक्षलागवडीचे महत्व पटवून दिले.

सरपंच श्री.जनार्दनजी चोरमले यांनी आज लावलेली झाडे भविष्यात कशी टिकली पाहीजेत यावर मार्गदर्शन केले. ‘एक मूल एक झाड’ याप्रमाणे ३० रोपे लावण्यात आली                 यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सचिन चोरमले, उपसरपंच श्री.रमेश पवार, तंंटामुक्ती अध्यक्ष श्री.आनंदा पवार सुभेदार श्री.दिलीप पवार ग्रामपंचायत सदस्य श्री.गणेश पवार अखिल भारतीय वारकरी संप्रदाय महाबळेश्वर तालुक्याचे अध्यक्ष श्री.श्रीरंग(तात्या) पवार सामाजिक कार्यकर्ते श्री.सुनिल पवार , श्री.आनंदा पांडुरंग पवार, तुकाराम पवार,एकनाथ गोळे व चंद्रकांत पवार अंगणवाडी सेविका सौ.नकुशा ओंबळे व सौ.छाया उंबरकर आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपशिक्षक श्री.तानाजी नगरे सर यांनी सर्वांचे आभार मानले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!