प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि.साताराचे कर्मचारी अभिजीत शिंगटे आदर्श कामगार पुरस्कार ने सन्मानित
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – अभिजीत शिंगटे
मेढा. दि.०६. गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांचे वतीने आदर्श कामगार पुरस्कार 2022 चा पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि.सातारचे कर्मचारीअभिजीत शिंगटे यांना आदर्श कामगार पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले.
सातारा येथील श्री समर्थ सदन पंचपाळे हौद राजवाडा सातारा येथे. मा. डॉ.श्री प्रसन्न बाबर (संचालक अजिंक्यतारा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सातारा) यांचे शुभहस्ते मा. डॉ.श्री. शंतनू पवार ( संचालक अजिंक्यतारा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल )यांचे उपस्थितीत मा.श्री. इकबाल काझी (अध्यक्ष गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा) यांचे अध्क्षतेखालील संपंन झाला.
यावेळी श्री.अभिजीत नारायण शिंगटे ( प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि.सातारा) , ) यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, देवून गौरविण्यात आले. यावेळी पुरस्कार प्राप्त सदस्यांचे कुटुंबिय,मित्र परिवार तसेच सातारा मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
हा कार्यक्रम संपन्न करणेकामी कामगार प्रतिष्ठान चे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सरचिटणीस, खजिनदार,सर्व कार्यकारणी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

मला मिळालेला “आदर्श कामगार पुरस्कार 2022” हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे सर्व पदाधिकारी अधिकारी,सहकारी यांचा आहे ,त्यांचे सहकार्य, मार्गदर्शन महत्वाचे असुन हा पुरस्कार मला प्रेरणादायक आणि जीवनाला दिशा देणारा ठरला आहे.



