
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – अभिजीत शिंगटे
मेढा.दि.११.नुकत्याच झालेल्या H.S.C.परीक्षेत वैष्णवी निकम हिने यश मिळवून आपल्या संस्थेचे, परिवाराचे नाव उंचावले आहे असे गौरोवोद्गार मेढा नगरीचे माजी सरपंच श्री. नारायणराव शिंगटे यांनी केले.
एच.एस. सी परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून धनंजय गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा येथील कॉमर्स विमागात शिकत असणारी मेढा येथिल श्री. महेश उर्फ संतोष वसंत निकम यांची कन्या विदयार्थीनी कु . वैष्णवी हिने ६००पैकी ५६३ गुण प्राप्त करून ९३.८३ % ने दैदिप्यमान यश मिळवले आहे.
वैष्णवी ने अकाऊंट विषयात १००पैकी ९९ गुण प्राप्त केले आहेत. वैष्णवी अभ्यासू व हुशार विदयार्थिनी असून तिच्या या यशाबद्दल तिचे ग्रामस्थ मंडळ मेढा, रहिवाशी, नातलग, आप्तेष्ट, जावली तालुका नाभिक संघटना यांनी तीने मिळविलेल्याा या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्री महेश उर्फ संतोष हे प्रतिथयश सलून व्यावसायिक असून आपल्या मुलांनी उच्च शिक्षण प्राप्त करून आपल्या कुटुंबाचा, समाजाचा, गावाचा नावलौकिक वाढवावा हि त्यांची मनोमन इच्छा असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी वैष्णवी ने मिळालेल्या यशाबद्दल बोलताना माझ्या या यशात माझे वडील व आई सौ. आशा निकम आणि गुरुजनांचा, तसेच मला प्रोत्साहित करणारे हितचिंतक यांचा मोलाचा वाटा असून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन असे सांगितले.



