महाराष्ट्रसातारासामाजिक

गाडवे कुटुंबाची मेढा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस अनोखी भेट

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
मेढा.दि.१४ मेढा तालुका जावली या शाळेचा एक उपक्रमशील शाळा म्हणून संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक आहे, या शाळेतील इयत्ता तिसरी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी गाडवे चि.सर्वज्ञ तुषार गाडवे याचा वाढदिवस त्याच्या आई-वडिलांनी इतर खर्च टाळून अनोख्या पद्धतीने साजरा करून पालक गाडवे यांनी लोकांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे उद्देश समोर ठेऊन गाडवे कुटुंबीयांनी आपल्या मुलाच्या शाळेत जवळपास तीन हजार रुपयांची विविध प्रकारची झाडे वृक्ष लागवडी साठी शाळेस भेट देऊन आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा केला. तुषार गाडवे व त्यांचे सर्व कुटुंब हे नेहमी सामाजिक कार्यात शाळेच्या कोणत्याही अडीअडचणीला अग्रेसर असतात त्यांनी अगोदर च्या काळात देखील शाळेत अनेकदा दातृत्वाच्या भूमिकेतून सहकार्य केले आहे अशी माहिती शाळेतून मिळाली.
गाडवे कुटुंबियाचे या अनोख्या सामाजिक कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेलार सर.वर्ग शिक्षिका कारंजकर मॅडम,सर्व शिक्षक सहकारी, ग्रामस्थ तसेच शाळा व्यवस्थापन समितीने सर्वज्ञ तुषार गाडवे याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तुषार गाडवे व त्यांचा सर्व परिवाराचे या अनोख्या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!