विध्यार्थी विकास सेवा संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे 22 वा विध्यार्थी गुणगौरव

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
केळघर दि.०९. विध्यार्थी विकास सेवा संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे 22 वा विध्यार्थी गुणगौरव व पारीतोषीक वितरण समारंभ संपन्न झाला.या समारंभात 130 विद्यार्थ्यांना तसेच यशवंत विध्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
तसेच सेवानिवृत्त व पदोन्नती झालेल्या सदस्यांचा तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या समारंभाला माजी विध्यार्थी , युवा उद्योजक भामघर गावचे सुपुत्र, अगलेन हेल्थकेअर लि., उद्योग समुहाचे मालक मा. अमितजी पार्टे, प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तसेच गटशिक्षणाधिकारी मा. चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख मा. विजय देशमुख गुरुजी, केंद्रप्रमुख – अरविंद दळवी गुरुजी, जावली सहकारी बँकेचे संचालक आनंदराव सपकाळ , विद्यार्थी विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. श्रीरंगभाऊ सपकाळ, सचिव – श्री. चंद्रकांत शेलार, खजिनदार – श्री. तुकाराम गोगावले, उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष व वेण्णा निरंजना पतसंस्थेचे संचालक विनोदराव शिंगटे, संपतराव सपकाळ, रविंद्र सपकाळ, कृष्णा सपकाळ, सचिन सपकाळ, मा. सरपंच – हनुमंतराव शिंगटे, मेढा सोसायटीचे मा. संचालक – राजाराम गोगावले, सरपंच – कृष्णा कांबळे, उपसरपंच – अशोक सपकाळ, अक्षय गोगावले, संपत रा. सपकाळ, सुभाष दळवी गुरुजी, पांडुरंग सपकाळ गुरुजी, राजकुमार सपकाळ आदी मान्यवर तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद , ग्रामस्थ, विद्यार्थी , युवा कार्यकर्ते , महिला , पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे मा. अमितजी पार्टे यांनी स्वतःची जडणघडण आपल्या शब्दांत प्रभावीपणे मांडत असताना मी यशस्वी उद्योजक कसा झालो हे विध्यार्थी मित्रांना आपल्या मनोगतातुन प्रोत्साहित केले. त्यांच्या वक्तृत्वाने सर्वांची मने भावुक झाली.
गटशिक्षणाधिकारी श्री.चंद्रकांत कर्णे सरांनी संस्थेचे कौतुक केले , केंद्रप्रमुख – अरविंद दळवी गुरुजी, आनंदराव सपकाळ यांनी आपली मनोगते व्यक्त केले, सचिव चंद्रकांत शेलार यांनी संस्थेचे प्रास्ताविक केले, विनोद शिंगटे यांनी उपस्थितांचे आभार मानले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम सपकाळ गुरुजी यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



