महाराष्ट्रसातारासामाजिक

तुफान पावसामुळे मेढ्यातील वेण्णा चौकाला तलावाचे स्वरूप….ठेकेदाराची मनमानी

 

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज –  मोहन जगताप

  सातारा.दि.२८.मेढा परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पावसाने तुफान हजेरी लावली त्यामुळे सर्वत्र पाण्याचे प्रचंड मोठे लोट वाहत होते. मेढा शहरात या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. तर मेढ्यातील वेण्णा चौक परिसरात रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे मेढा नगरपंचायतीच्या कारभार           पुन्हा एकदा नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने “आंधळ दळतय अन कुत्र पीठ खातय ” अशी जनमानसात चर्चा होत असून सर्वसामान्य लोक ठेकेदाराच्या व बांधकाम विभागाच्या मनमानीस कंटाळले असून मेढा नव्हे तर मोळाच्या ओढ्या पासून हीन दर्जाची कामे धीम्या गतीने होत असल्याची चर्चा रंगली असून तालुक्यातील राज्यकर्ते तेरी भी चूप मेरी भी चूप अशीच भूमिका असल्याने या परिसरातील रखडलेल्या कामासाठी राजकीय पुढाऱ्यांनी सामोरे जाण्याची मागणी सर्वसामान्य प्रवाशी करीत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे.गुरुवारी सायंकाळी मेढा परिसरात पावसाने अचानक हजेरी लावली. दिवसभर पडलेल्या उन्हामुळे पावसाचा विचार सहसा कोणी केला नव्हता. मात्र अशातच सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पावसाने तुफान हजेरी लावली. एक तासापेक्षा जास्त वेळ पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी ओढेनाले पूर्णतः भरून वाहत होते.
या पावसामुळे मेढा शहर बऱ्याच ठिकाणी जलमय झाले होते. मेढ्यातील रस्त्यांवर पाण्याचे मोठमोठे लोट वाहत होते. त्यामुळे या त्रासाचा सामना मेढा शहरातील नागरिकांना करावा लागत होता. मेढ्यातील वेण्णा चौक परिसरात बैलबाजार परिसरातून येणारा ओढा उलटल्यामुळे या परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले होते. मेढा शहरातील रस्ता रुंदीकरणाचे काम झाले तेव्हा मूळ ओढे रुंदी कमी झाल्यामुळे ओढ्यांचे पाणी रस्त्यावर उलटून हा परिसर पूर्णतः जलमय झाला होता. आज घडलेल्या या प्रकारामुळे मेढ्यातील नागरिक चांगलेच संतप्त झाले होते. आज घडलेल्या या प्रकाराला नगरपंचायत, बांधकाम विभाग का रस्ते ठेकेदार जबाबदार हाच प्रश्न येथील नागरिकांकडून उपस्थित होत होता. संबधित विभागाने दिलेल्या कालावधीत या रस्त्याचे व पुलाच्या व इतरही बांधकामे त्वरित करून जनसामान्यांच्या अडचणी दुर करण्याची मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे
==========================

मेढा येथील वेण्णा चौकात तुंबलेले पाण्याचे दृष्य   (छायाचित्र – मोहन जगताप)                                                                   राजकीय आर्थिक घडामोडीत ” तेरी भी चूप मेरी भी चूप ” करीत” आंधळ दळतय अन कुत्र पीठ खातय “आज झालेल्या अतिवृष्टीसदृश परिस्थितीमुळे मेढ्याची तुंबई झालेली आहे. यासाठी नगरपंचायत, बांधकाम विभाग की रस्ते ठेकेदार जबाबदार ? मुळ ओढा हा छोटा केल्यामुळे हा प्रकार घडला असून याच तातडीने दुरुस्ती व्हावी अन्यथा ठेकेदारास धडा शिकवण्यात येईल.

प्रकाश कदम
सामजिक कार्यकर्ते, मेढा
==========================

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!