महाराष्ट्रसातारासामाजिक

दसरा मेळाव्यात उद्धवजी ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे सर्व शिवसैनिकांचे लक्ष

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज


मेढा.दि.२५.दसरा मेळाव्याकरीता शिवसेनेला उच्च न्यायालयाने परवानगी दिली असून यामुळे समस्त शिवसैनिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून या मेळाव्यात मानानिय उध्दवजी ठाकरे साहेब आपली कोणती भुमिका मांडणार, काय निर्णय घेणार याकडे शिवसेना पक्षाबरोबरच विरोधी पक्षाचेही लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घडामोडीमुळे ठाकरे गट आणि शिंदे गट असा शिवसेना पक्ष विखुरला गेला असून त्यातच दोन्ही बाजुनी शिवाजी पार्कमध्येच मेळावा घेणार अशी खरमरीत चर्चाचे रुपांतर न्यायालयीन प्रक्रियात होवून अखेर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बाजुने निकाल दिल्याने या दसरा मेळावा मधून मा.उद्धवजी ठाकरे आपल्या शिवसैनिकांना नक्की काय मार्गदर्शन करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असले तरी हा मेळावा समस्त शिवसैनिकांना बळ आणि ऊर्जा देणारा ठरणार आहे.
गेली अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातुन महाराष्ट्राचे राजकारण सुरळीतपणे चालविणाऱ्या या घटक पक्षांमध्ये शिवसेना पक्षातच फुट पडल्याने राजकारणात मोठा भुकंप निर्माण होवून महाराष्ट्रातील राजकारणात अस्थिरता निर्माण झाल्याने महाविकास आघाडीला कमी वेळेतच आपला कारभार आटोपता घ्यावा लागला असून याची खंत उघडपणे जाहीर होत असल्याने या दसरा मेळाव्याला महत्व प्राप्त झाले आहे. या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना उभारी देण्याचे काम पक्ष प्रमुख करतील यात काही शंका नाही परंतु या मेळाव्यात ठाकरे साहेब शिवसैनिकांना कोणता आदेश देणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!