महाराष्ट्रसातारासामाजिक

ठाणे पोलीस दलातील रविंद्र मोरे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज – मोहन जगताप

सातारा.दि.०७ केसकरवाडी ता.जावली येथील सेवानिवृत्त माजी सैनिक व सेवानिवृत्ति नंतर ठाणे पोलीस दलात कळवा पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र आनंदराव मोरे 48 यांचे कार्यरत असताना छातीत दुखत असल्याने त्यांना वाशी येथील फोर्टिज हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान डॉक्टरानी मृत्यू घोषित केले.


आज दुपारी त्यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी केसकरवाडी ( वाघेश्वर ) या ठिकाणी आणण्यात आला.भणंग पंचक्रोशीतील लोकांनी या जवानांस अभिवादनासाठी गर्दी केली होती.
दरम्यान सातारा पोलीस दलाच्या वतीने या जवानास वाघेश्वर येथील मेरू विद्या मंदिराच्या पटांगणावर मेढ़ा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली बंदुकीच्या 21 फैरी हवेत झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली.
यावेळी रविंद्र मोरे यांच्या मुलाने मुखाग्नि देवून अखेर दर्शन घेतले त्यांच्या पाश्चात्य आई वडील पत्नी, भावु.मुलगा मुलगी असून त्यांच्या निधनाबद्दल आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिव सपकाळ ,वसंतराव मानकुमरे,दिपक पवार, सौरभ शिंदे ,जेष्ठ पत्रकार मोहन जगताप यांनी दुःख व्यक्त केले. त्यांचा सावडण्याचा विधि रविवार सकाळी 9 वाजता मूळ गावी होणार आहे

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!