महाराष्ट्रमुंबई व नवी मुंबईसातारासामाजिक

मेढा.ता.जावली येथिल श्रीमंत टॉवर शेजारील ओढ्यावरील कठडा धोकादायक


मेढा.दि.०३.सातारा – महाबळेश्वर रस्त्याचे काम सुरू असुन बर्याच ठिकाणी ओढ्यावरील पुलाचे काम अपूर्ण आहे सदर अपूर्ण कामामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

जावळीची राजधानी मेढा येथील सातारा जिल्हा बॅक शेजारी असणारे ओढ्यावर कोणताही कठडा बांधला नाही अथवा ग्रील सुद्धा उभे केलेले नाही त्यामुळे याठीकाणी अपघात होणेची संभवना जास्त आहे दळवी व्हारायटी, ब्रदर्स, तसेच सातारा जिल्हा बॅकेच्या मेढा शाखेत कायम गर्दी असते त्यामुळे तेथे येणारे ग्राहक , कर्मचारी आपली दुचाकी रस्त्याचे कडेला उभी करतात परंतु सदर छोटे पुलावर कठडा नसलेने वाहन रस्त्यावरुन खाली पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी स्थानीक नेतेमंडळी व नगरपंचायतीने याकडे त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी जावळीच्या राजधानीत येणाऱ्या जावळीच्या जनतेतुन होत आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!