महाराष्ट्रमुंबई व नवी मुंबईसातारासामाजिक

सातारा-मेढा रस्त्यावर चिंचणी येथिल भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर पाच जण जखमी

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज —

मेढा. दि.२८ सातारा-मेढा मार्गावरील चिंचणी (ता. सातारा) गावाच्या जवळ चारचाकी गाडी व दुचाकीच्या अपघातात मेढा येथील २ जण ठार झाले. तर चारचाकी वाहना मधील लहान मुलासह ५ जण जखमी झाले. आज दुपारी २वाजण्याच्यासुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, भरत यदु शेलार,वय 48, रा. थोरली काळोशी व रघुनाथ दत्तात्रय चिकणे,वय 54, रा. मेढा,अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी गाडी मेढ्याहून सातारकडे येत होती. यावेळी चिंचणीनजीक चारचाकी गाडीचा अचानक टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारास उडवले. त्यानंतर दोन्ही वाहने नाल्यामध्ये कोसळली. यात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी होऊन ठार झाले. तर चारचाकीमधील एक १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. तर इतर ५ जण किरकोळ जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच चिंचणीसह परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी गर्दी केली होती. घटनास्थळी सातारा तालुक्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके,तसेच मेढा पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या समवेत पोलीस कर्मचारी दाखल झाले.या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास महेंद्र पाटोळे करत आहेत.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!