धार्मिकमहाराष्ट्रसातारासामाजिक

कसबे बामणोली तालुका जावळी,येथील श्री भैरवनाच्या यात्रेला दि.०७ डिसेंबर पासून प्रारंभ

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज — सचिन सिंदक

बामणोली.दि.०१.कसबे बामणोली ता. जावली येथिल दिनांक ७ डिसेंबर २०२२ व ८ डिसेंबर २०२२ रोजी ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रेला प्रारंभ होत आहे.७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ८ ते १० वेळेत सर्व ग्रामस्थांच्या व भाविकाच्या उपस्थितीत श्री भैरवनाथाचा अभिषेक पार पडणार आहे, सकाळी १० ते ५ या वेळेत मुंबई व ग्रामस्थ मंडळ व सिद्धार्थ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भागातील शालेय मुलांच्या विविध मैदानी स्पर्धांचे व वैयक्तिक कला सादर करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

उपस्थित मान्यवर मंडळीच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात येणार आहे,७ डिसेंबर २०२२ रात्री ८ ते १0या वेळेत मान्यवर व गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात येणार आहे व त्यानंतर ऑर्केस्ट्रा झंकार बिट्स चा कार्यक्रम रात्री होणार व त्यानंतर रात्री देवाचा छबिणा निघणार आहे़.

दुसऱ्या दिवशी सकाळी ८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते ३ पर्यंत आलेले भाविक आलेल्या पालखीचे दर्शन कार्यक्रम पार पडणार आहे व यात्रेसाठी आलेल्या मंडळीना मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी ३ ते ५ या वेळेत परीसरातील पैलवानाचा कुस्तिचा फड व नंतर आलेल्या पालखीचा तळेभरणी पार पडणार आहे व त्यानंतर विविध भागातून आलेल्या पालख्या परत आलेल्या गावी मार्गस्थ होणार आणि यात्रेची सांगता होणार आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!