महाराष्ट्रराजकीयसातारासामाजिक

केळघर तर्फ मेढा येथे सर्वसाधारण स्त्री सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज —- युवराज धुमाळ

केळघार.दि.०२ ग्रामपंचायत निवडणूक २०२२अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवसा अखेर केळघर तर्फ मेढा येथिल ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ७ जागा व सर्वसाधारण स्त्री सरपंच पदासाठी १ जागा आहे.
  एकूण जागेपैकी महिला सरपंच पदासाठी आज ५ अर्ज व सदस्य पदासाठी ६ अर्ज आज दाखल करण्यात आले.तसेच सरपंच पदासाठी एकूण ५अर्ज आज भरले असून वार्ड क्रमांक १मधून अनुसुचित जाती स्त्री साठी १ अर्ज, सर्वसाधारण साठी १ अर्ज,वार्ड क्रमांक २ मधून सर्वसाधारण स्त्री १ अर्ज, सर्वसाधारण १ अर्ज वार्ड क्रमांक ३ मधून सर्वसाधारण स्त्री १ अर्ज, सर्वसाधारण १ अर्ज एकूण ११ अर्ज आज भरण्यात आले.

५० वर्षाची बिनविरोध निवडणूक परंपरा असलेले गाव
पंचायत समिती,जिल्हा परिषद असो किंवा विविध संस्थांच्या निवडणुक असो केळघरला नेहमीच प्राधान्य असते त्यामुळे केळघर मध्ये सरपंच कोण होणार, निवडणूक होणार की बिनविरोध होणार याकडे जावली तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.


ग्रामपंचायत निवडणूक लागली की,गावातील वातावरण ढवळून निघते. त्यातच सद्या सरपंचपदाची निवड थेट जनतेतून असल्यामुळे ‘माझ्याच कुटुंबातील स्त्री सरपंच होणार’ म्हणून अनेकांनी शड्डू ठोकलेत.त्या पद्धतीने फिल्डींग लावण्यात सुरुवात केली आहे.माझ्याच कुटुंबातील स्त्री सरपंच होणार म्हणून गावातील राजकारणाचे वातावरण तापू लागले आहे.कोण सरपंच होणार या कडे पूर्ण गावाचे लक्ष लागले असून,नवीन सरपंच होणार यांच्या कडून गावाचा विकास होणार का,?गावातील मूलभूत सुविधा नविन सरपंचांकडून मिळणार का ? या संभ्रम अवस्थेत सध्या केळघरचे नागरिक आहेत.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!