क्राईममहाराष्ट्रसातारा

मेढा पोलिसांची मोठी कारवाई २लाख १९ हजार रुपये किंमतीचा गुटखा मुद्देमालासह जप्त…

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज युवराज धुमाळ

मेढा. दि.१८. सातारा महाबळेश्वर मार्गावर गवडी गावच्या हद्दीत बौद्ध वस्तीकडे जाणाऱ्या रोडच्या समोर दि. १७ रोजी रोजी अवैध गुटख्याची विक्री करत असताना मेढा पोलीसांनी अवैध गुटखा व पान मसाल्याची विक्री करत असताना थेट कारवाई करून अंदाजे २ लाख १९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.


सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या नेतृत्वा खालील ही जावली तालुक्यातील गुटखा विक्रीवर मोठी कारवाई असून त्यामुळे गुटखा माफियांना चांगलाच चाप बसणार आहे.
या प्रकाराबाबत अन्न सुरक्षा अधिकारी सातारा अनिल पवार यांनी मेढा पोलीस स्टेशन फिर्याद दिली असून समद अक्तार पठाण वय २८ वर्ष रा .सातारा , शंकर मधूकर मोरे वय ३२ रा .पाचवड यांच्या विरोधात महाराष्ट्र शासन उत्पादन विक्री व वहातुक व साठा करण्यासाठी प्रतिबंध केलेल्या विविध प्रकारचे ब्रॅण्ड पान मसाला, सुंगधी तंबाखु विक्री हेतु साठा केला असल्यामुळे गुन्हा दाखल करून मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.

विक्री करताना पकडण्यात आलेला गुटखा व सुंगधी तंबाखू , आणि आरोपी यांच्यासह स. पो. नि. अमोल माने व सहकारी

यामध्ये मोटासायकल अव्हेंजर गाडी क्र. MH 11 cc 1777 व ॲक्टिवा गाडी क्रमांक MH11DF6015 या दोन गाडयांसह दोन लाख एकोणीस हजार शंभर रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यातआला आहे .ही कारवाई स. पो. नि. अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पो.ह.श्री.नितिन जाधव करीत आहेत.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!