महाराष्ट्रसातारासामाजिक

रावसाहेब दानवेंचा निषेध करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीचे दिले निवेदन

स्टार११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ

मेढा.दि.०८ भाजपचे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे महाविकास आघाडीवर बोलत असताना त्यांनी _तिरुपती बालाजी येथील नाभिक समाजाच्या नाभिक बांधवांवर नव्हे तर तमाम नाभिक बांधवांचा अवमान कारक वक्तव्य केले त्याबद्दल त्यांचा निषेध करणारे व त्यानी नाभिक समाजाची माफी मागावी अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा हे निवेदन भारताचे पंतप्रधान मां, नरेंद्र मोदी यांना ते पोहचावे व त्यांनां ही समजावे की आपलेच मंत्री महोदय किती बेजबाबदार वाचा ळवीर वर्तन वक्तव्य करतात जाती वाचक बोलून नाभिक समाज्याची बदनामी करून अपमानास्पद वर्तन करतात . म्हणुन महाराष्ट्रात आज प्रत्येक जिल्ह्यात राज्याध्यक्ष कल्याणराव दळे साहेब यांच्या नेतृत्वा खाली तसेच आज सातारा जिल्हयतील प्रत्येक तालुक्यात सर्व नाभिक बांधव यांनी तहसीलदार व कलेक्टर ऑफिस मध्ये निवेदन दिले आहे.

महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ सातारा व संलग्न श्री संत सेना महाराज नाभिक समाज संघटनेच्या जावळी व महाबळश्वर तालुक्याच्या वतीने जावळीचे तहसिलदार राजेद्र पोळ यांना निवेदन दिले . त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यात सातारा जिल्हा ओबीसी समन्वयक व महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सातारा जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांच्या नेतृवाखाली निवेदने देण्यात आली .

जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ तालुकाध्यक्ष राजेंद्र निकम खजिनदार संजय गायकवाड मेढा शहर प्रमुख सुर्यकांत निकम गणेश सपकाळ सचिन गायकवाड आदीनी रावसाहेब दानवेंचा निषेध करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले .

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!