महाराष्ट्रशैक्षणिकसातारा

वावरहिरेच्या शाळेतील १०वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात

 

स्टार११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – एकनाथ वाघमोडे

वावरहिरे दि.११ मौजे वावरहिरे, ता.माण या ठिकाणी वावरहिरे येथील पाणलिंग विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात पार पडला.येणाऱ्या बोर्ड परिक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देणं,या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.जगदाळे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, येणाऱ्या भावी आयुष्यात आपल्याला कितीही अपयश आले तरी,खचून न जाता आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करत यशाची शिखरे पादाक्रांत करा.त्याचबरोबर आपल्यातील भक्कम बाजू शोधून आपल्याला निसर्गतः मिळालेल्या विविध गोष्टीचा उपयोग करून आपल ध्येय गाठा.
त्याचबरोबर यावेळी बोलताना भोसले सर म्हणाले की आपल्या या शाळारूपी घरट्यातून कुठंही गेला तरी आपलं ध्येय गाठून परत या,शाळेला कदापीही विसरू नका.त्याचबरोबर राजगे सरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना “कन्या सासुरसी जाये।मागे परतुनी पाहे” या काव्यपंक्तीचा दाखला देताना कुठेही गेला तरी आपल्याला आठवण होईल त्यावेळी शाळेत परत या,अशी भावनिक साद घातली.
यावेळी प्रा.जगदाळे,मुख्याध्यापक खराटे ए. जी,सरपंच चंद्रकांत वाघ,स्कूल कमिटीचे स्थायी सदस्य चव्हाण गुरुजी,ग्रा.पं.सदस्य मल्हारी जाधव,दत्ता भोसले,संदीप अवघडे, पेंटर धनाजी भोसले, ग्रा. पं.कर्मचारी बाळू भोसले,गणेश वाघ,प्रणय गुळीक, यांचेसह शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक खराटे ए. जी.यांनी केले तर सूत्रसंचालन श्री.रुपनवर सर यांनी केले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!