महाराष्ट्रसातारासामाजिक

धरणीमाता फौंडेशनच्या वतीने महिलांच्या आर्थिक विकासाचे पैलू या विषयी मार्गदर्शनपर मेळावा

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – सुर्यकांत पवार (सर)

कास. दि.१२.    जागतिक महिला दिनानिमित्त धरणीमाता फौंडेशनच्या वतीने मौजे कुडाळ ता. जावली या गावात महिलांच्या आर्थिक विकासाचे पैलू या विषयी मार्गदर्शनपर मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून वेदात्री व्हेंचर कंपनी चे संस्थापक अमोल दडस तसेच कमिन्सचे रमेश सोनवलकर, विजय क्षीरसागर उपस्थित होते.

महिलांचा आर्थिक विकास साधण्यासाठी महिलांनी काय करावे, गुंतवणुकीचे पर्याय तसेच नेतृत्व विकास या विषयी अमोल दडस मार्गदर्शन केले. विविध मनोरंजनात्मक खेळ महिलांसाठी या कार्यक्रमाच्या वेळी आयोजित करण्यात आले होते त्यातून स्वतः मधील क्षमतांची जाणीव महिलांना झाली. तळागळातील महिलांना आर्थिक विकासाचा मार्ग दाखवण्याचे काम या महिला दिनानिमित्त संस्थेने केले.

कार्यक्रमाच्या शेवटी कष्टकरी महिलांचा सन्मान आकर्षक भेट वस्तू देऊन करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!