स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
कुडाळ. दि.११ जावली तालुक्यातील पटसंख्या आणि गुणवत्तेत अग्रेसर असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कुडाळ शाळेचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे.लॉकडाऊनच्या परिस्थितीतही येथील शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून सैनिक स्कूलच्या पात्रता परीक्षेत शाळेने नेत्रदीपक यश मिळवले आहे.
सन २०२१-२२ मध्ये झालेल्या या सैनिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेमध्ये श्रेयस जमदाडे, ओमराजे गायकवाड श्रीनाथ रासकर, स्वराज पवार, वैदवी रासकर ,अनुष्का शेवते अथर्व शेवते,श्रावणी साळुंखे, आर्यवीर पवार यांनी पात्रता परीक्षेत यश संपादन केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळवणारी जिल्हा परिषदेची जावली तालुक्यातील कुडाळ ही एकमेव शाळा आहे.
या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका मेघा चव्हाण,जोत्स्ना वायदंडे यांनी मार्गदर्शन केले.शाळेच्या उज्वल यशाबद्दल नवीमुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी अरुणा यादव , गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल ,विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे,केंद्रप्रमुख अरविंद दळवी, मुख्याध्यापिका जयश्री गायकवाड ,सर्व शिक्षक वृंद,ग्रामस्थ,पालक आदींनी अभिनंदन केले.



