मुंबई व नवी मुंबईसामाजिक

युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारतच्या मुंबई व जिल्हा टीमच्या वतीने राष्ट्रीय महिला दिन साजरा

युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारतच्या मुंबई व जिल्हा टीमच्या वतीने राष्ट्रीयमहिला दिन साजरा

मुंबई दि.१४ राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारतच्या मुंबई व जिल्हा टिम च्या वतीने के. ई. एम. हॉस्पिटल मधील नर्सेस व त्यांच्या वरिष्ठ अधिकारी महिलांना सन्मानित करण्यात आले.
युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्री.तरुण जी बाकोलिया,महिला राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.सौ.सुमन जी मौर्य यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत, व महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ. सुवर्णा ताई कदम यांच्या सुचणे नुसार व सौं सुजाता (ममता) सावंत महाराष्ट्र कोकण संघटक (महिला) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई अध्यक्ष श्री. अमोल वंजारे यांच्या सूचनेनुसार व उपस्थितीत आज दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारतच्या मुंबई व जिल्हा टिम च्या वतीने के. ई. एम. हॉस्पिटल मधील नर्सेस व त्यांच्या वरिष्ठ अधिकारी महिलांना शाल,मास्क, अल्पोपहार व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.


एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत, स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री, असा समज सर्वसाधारणपणे रूढ होता. म्हणूनच, समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार, तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या. मात्र, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर, आपल्यावर होणारा अन्याय, आपले हक्क याबाबत स्त्रियांमधे सजगता येऊ लागली.भारतात स्त्रीवर होणा-या अन्यायाला वाचा फोडली. त्यामध्ये राजा राम मोहन रॉय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे विसरुन चालणार नाही.
दरम्यान रामदूत हुनुमान मंदिर करिरोड येथे परेल ब्लॉग अध्यक्षा सौं प्रमिला अडसूळ तसेच करिरोड ब्लॉग अध्यक्षा सौं प्राची तळेकर यांनी युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारतच्या मुंबई जिल्हा टीमच्या सूचनेनुसार आयोजन करून सामाजिक कार्यात सदैव कार्यतत्पर व आत्मीयता असणाऱ्या श्रीमती सुलेखा संजय गटकळ (समाज सेविका) व श्रीमती मनीषा सुर्वे (समाज सेविका) ह्यांना मुंबई टीमच्या वतीने सेवा योद्धा सन्मानपत्र शाल व पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमास मुंबई महिला सचिव सौं वसुधा वाळुंज, चिंचपोकळी अध्यक्ष श्री सुहास परब, शिवडी असेम्ब्ली विभाग सहसचिव श्री हिमांशू आर्डेकर, घाटकोपर ब्लॉग अध्यक्ष श्री प्रकाश तुकाराम आंब्रे, दादर ब्लॉग अध्यक्ष श्री संजीव परमार, चिंचपोकळी ब्लॉग सचिव श्री दत्तराज आंब्रे, घाटकोपर सहसचिव श्री हितेश गायकवाड, सदस्या सौं रुपाली मिसाळ, श्रीमती वासंती राणे आदी वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!