राजकीय

भारतीय जनता पार्टी तर्फेआ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वितरण शुभारंभ

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——

सातारा. दि. १२. स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा, घर घर तिरंगा या अभियंनंतर्गत सातारा जावळी चे भा ज पा आमदार श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्फत सातारकरांना राष्ट्रध्वज वितरण करण्यात येत आहेत , त्याचा शुभारंभ आज सकाळी मोती चौक येथे करण्यात आला, या ठिकाणी श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारकरांना राष्ट्रध्वज तिरंग्याचे वितरण केले.

या वेळी बोलताना श्री छ शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले कीं स्वातंत्राच्या अमृत मोहोत्सवा निमित्त घर घर तिरंगा, हर घर तिरंगा हे अभियान करण्यात येणार आहे, सर्वांनी 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत आपल्या घरावर, व्यावसायिक आस्थापनावर, दुकानावर, कंपनी वर सर्व ठिकाणी तिरंगा ध्वज लावावा,त्या राष्ट्रध्वजाची काळजी घ्यावी,कार्यकर्ते घरोघरी येऊन तिरंगा वितरण करणार आहेत, भा ज पा कार्यालयातून घेऊन जावेत असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

यावेळी भा ज पा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, विधानसभा निवडणूक प्रमुख, नगरसेवक अविनाश कदम, नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेविका सिद्धी पवार, नगरसेवक सुनील काळेकर, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉक्टर वीरेंद्र घड्याळे, व्यापारी आघाडी अध्यक्ष डॉक्टर सचिन साळुंखे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष रीना भणगे कायदा आघाडी चे ऍड सचिन तिरोडकर, जिल्हा कोशाध्यक्ष किशोर गोडबोले, आरोग्यसेवा आघाडी अध्यक्ष आप्पा कदम महिला मोर्च्या उपाध्यक्ष अनिता बोडस,युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम बोराटे, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके,शहर चिटणीस कुंजबाला खंदारे,ओ बी सी मोर्च्या अध्यक्ष राजू गोरे,नगरसेवक विजय काटवटे, अनु जाती मोर्चा सरचिटणीस विक्रम अवघडे,हर्षलभैया चिकणे,श्रीकांत वेलणकर,संपत जाधव, अक्षय गवळी,प्रदीप जाधव, विस्तारक अविनाश खर्शीकर आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!