फासेपारधी समाजावर आधारित I’m पुंगळ्या शारूक्या आगीमहुळ हे नाटक ऐरोलीत हाऊसफुल्ल !

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – दिनेश हुल्ले
दिघा.दि.२०. शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान सेवा संस्था नवी मुंबई, निर्मित, माळरानावर फुललेलं नाटक आय.एम. पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ या नाटकाचा प्रयोग रविवार रो.१९ जुन रोजी संध्याकाळी ६.०० वा. JVM मेहता कॉलेज ऑडीटोरीयम, सेक्टर -१९, ऐरोली, नवी मुंबई येथे रसिकप्रेक्षकांच्या खास आग्रहास्तव झाला.
या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, मुख्य अभिनेते आणि निर्माते अशा चार महत्त्वपूर्ण बाजूंची लिलया प्रशांत निगडे यांनी पेलवली आहे . या नाटकात ‘पुंगळ्या’ आणि ‘नानादादो’ अशा विभिन्न भूमिका साकारून प्रशांत निगडे यांनी रसिकप्रेक्षकांना अंतर्मुख केले आहे. ऐरोली नवी मुंबईतील रसिकप्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादात नाटकाचा प्रयोग संपन्न झाला.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचालनालय आयोजित साठाव्या राज्यनाट्य स्पर्धेत या नाटकाला मुंबई आणि अंतिम फेरीसह एकूण दहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
लेखकाच्या लेखणीतून उमटलेल्या एका प्रश्नातून अख्या नाटकाचा सार कळतो, “गरीब कोण?जो कागदपत्रे दाखवून गरीब असल्याचे मांडत राहतो तो, की ज्याची नोंदच नाही तो गरीब ?” या नाटकातील मुख्य अभिनेत्री विरिशा नाईक यांनी साकारलेली ‘मतलबी’ नावाची भूमिका पारधी बाईची शोकांतिका मांडणारी आहे.त्याचबरोबर श्रद्धा शितोळे या अभिनेत्रीने ‘फिरंगी’ आणि ‘लक्ष्मी’ या दुहेरी भूमिकेतून स्वतःच्या अभिनयाची छाप उमटवली आहे,या तिनही कलावंतांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचालनालय आयोजित साठाव्या राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या कलावंतांच्या अभिनयाची जादू रसिकप्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवते.
या नाटकाच्या प्रयोगाला मा. श्री विजय चौगुले साहेब, सौ.हेमांगी अंकुश सोनावणे, सदानंद गोळे , जेष्ठ अभिनेते प्रसाद पंडित , शिवलाल निगडे, सुनिता निगडे, विजय खोपडे, अभिनेते ज्ञानेश वाडेकर , आदित्य हळबे, आर.जे. नेहा वझे, रवी वाडकर, संदिप जंगम, अशोक पालवे, विनायक म्हात्रे, मंगेश कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली.
उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट प्रकाश योजना, उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट पार्श्वसंगीत, उत्कृष्ट रंगभूषा, उत्कृष्ट निर्मिती असे पुरस्कार प्राप्त असलेल्या कलाविष्काराचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक प्रयोग व्हावेत असे मा. श्री विजय चौगुले यांनी मत मांडले. त्याचबरोबर लोकप्रिय जेष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांनी प्रशांत निगडे आणि त्यांच्या संपूर्ण नाट्यसंघाचे कौतुक केले.
शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान नाट्य संस्थेतील संतोष कदम,सुजित भोये, मनीष सावंत, निलम चव्हाण, सुनील मेस्त्री, कृष्णा- देवा, ऋत्विक मनचेकर, अजय बोराटे, षण्मुखानंद सुरेखा, प्रेम कन्होजिया,प्रज्योत देवळे, निखिल धोमकर, निखिल चौगुले,आदित्य ओव्हाळ, सौरभ कामथे, प्रतिक साठे, पायल जगताप, स्नेहल गंगणे, ओमकार तेली, प्रसाद भुसाणे, निधी जाधव, राहूल कोंडे, आनंद सलवदे या सर्व कलावंतांमुळे हा प्रयोग यशस्वी रित्या पार पडला. स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा या लोकप्रिय मालिकेतील गाजलेल्या ‘बबनदादा’ या भूमिकेतील अभिनेते प्रशांत निगडे यांचे रसिकप्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. त्याचबरोबर I’m पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग पुन्हा एकवार नवी मुंबईतील रसिकप्रेक्षकांसाठी व्हावा अशी प्रेक्षकांनी मागणी केली.



