महाराष्ट्रराजकीयसातारा

मेढा नगरपंचायत कर आकारणी सुनावणीसही स्थगिती मिळेल आ.शिवेंद्रसिंहराजे;

सातारा. दि.०८ – जितेंद्र जगताप वृत्तसंपादक                   सातारा पालिका आणि मेढा नगरपंचायत अशा दोन वेगवेगळ्या फाईल्स नगर विकास विभागाकडे गेल्या होत्या. नगर विकास विभागाकडून सातारा पालिकेची फाईल आधी पोहचली त्यामुळे त्यावर आधी स्वाक्षरी झाली. मेढा नगरपंचायतीची फाईल सुद्धा मुख्यमंत्र्याच्या स्वाक्षरीसाठी सादर झालेली आहे. त्यामुळे येत्या दोन- तीन दिवसात वाढीव कर आकारणी सुनावणी स्थगित केल्याचे आदेश निघतील. ही एक प्रशासकीय कार्यालयीन प्रक्रिया आहे. मी दिलेला शब्द पूर्ण करणारा आमदार आहे, हे समस्त जावलीकर जाणतात. त्यामुळे अमित कदमांनी फुकटची काळजी दाखवू नये, असा टोला आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.

सातारा नगर पालिकेप्रमाणेच मेढा नगरपंचायतीच्या करवाढ आकारणीस स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे पूर्वीच केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याचवेळी सातारा प्रमाणेच मेढा नगरपंचायतीच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीस स्थगिती देण्याच्या तोंडी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या आणि त्याचवेळेपासून सदरची प्रक्रिया थांबली आहे. शासनाकडून अधिकृत आदेश मिळण्यासाठी सातारा पालिका आणि मेढा नगरपंचायत असे दोन स्वतंत्र प्रस्ताव नगर विकास विभागाकडे दाखल करण्यात आले होते. दोन वेगवेगळ्या फाईल्स होत्या त्यात नगरविकास विभागाकडून सातारा पालिकेची फाईल आधी पोहचली. मेढा नगरपंचायतीची फाईलही नगरविकास विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आली आहे. ही एक प्रशासकीय कार्यालयीन प्रक्रिया आहे. त्यानुसार येत्या दोन- तीन दिवसात याही फाईलवर स्वाक्षरी होईल. मी कालच मुख्यमंत्री ना. शिंदे यांची भेट घेतली असून मेढा नगरपंचायतीच्या कर आकारणी स्थगितीबाबत पुन्हा चर्चा झाली. त्यामुळे येत्या दोन- तीन दिवसात मेढ्याच्या कर आकारणीस स्थगिती मिळाल्याचे अधिकृत आदेश निघतील.

मेढा नगरपंचायतीची चतुर्थ वार्षिक कर आकारणी सुनावणी प्रक्रिया यापूर्वीच स्थगित करण्यात आली आहे आणि नगर विकास विभागाकडून लवकरच तसे अधिकृत आदेश जारी होतील. त्यामुळे आमदारांनी शब्द पाळला नाही अशी आवई उठवत अमित कदमांनी फुकटची काळजी दाखवून जावलीतील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. दिलेला शब्द पाळणारा मी माणूस आहे, हे जावलीतील जनता, मतदार यांच्यासह अमित कदम यानांही चांगले माहिती आहे. त्यामुळे कोणत्याही बाबतीत अमित कदमांनी जावलीकरांची काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!