
स्टार११महाराष्ट्र न्युज नेटवर्क
मेढा.२७ ओझरे गावातील विकास कामांसाठी जिल्हा परिषद फंडातुन पंधरा लाखाचा निधि जि.प. सदस्य दिपक पवार यांनी दिला असून त्या विकास कामांना उपसरपंच तथा प्रभारी सरपंच अजित मर्ढेकर यांचा विरोध होत असून स्वतःच्या स्वार्थापायी महिला सरपंच रुपाली जंगम यांना हटवुन स्वतःची मनमानी व भ्रष्टाचारी कारभार सुरु केला असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत ओझरे ग्रामस्थांनी केला आहे.

उपसरपंच अजित मर्ढेकर गावात विकास काम होऊ देत नाहीत याबाबत ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला शिवाजीराव मर्ढेकर, महेश मर्ढेकर , अजित निवृत्ती मर्ढेकर, निवृत्ती मर्ढेकर, गेणु मर्ढेकर, गुलाबराव मर्ढेकर , बजीरंग मर्ढेकर , तुकाराम लकडे , पांडुरंग दळवी, अरुण कदम, मोहन मर्ढेकर, विवेक मर्ढेकर आदी उपस्थित होते
शिवाजीराव मर्ढेकर म्हणाले ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी गावचा विकास करित असताना विकासाला प्राधान्य देणे आवश्यक असते. निधी कोणी दिला कोणाचा आहे याला महत्व न देता कामे करायची असतात .विकास कामात पक्षीय राजकारण आणायची गरज नाही जो कोणी फंड देईल तो फंड वापरून विकासात्मक कामे करायची असतात परंतु उपसरपंच तथा प्रभारी सरपंच अजीत मर्ढेकर विकास काम करण्यास विरोध करीत आहेत असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.
माजी सरपंच रुपाली जंगम यांच्या काळात समाज कल्याण मधुन अलेले मागासवर्गीय वस्तीतील रस्ता काँक्रीटीकरणाच्या आणि काळेश्वरी सभा मंडपाला तसेच सभामंडपाचे उर्वरीत बाधकाम पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले . ती कामे पूर्ण झाली . त्यावेळीही ही कामे दिपक पवार यांच्या फंडातुनच करण्यात आली होती सरपंच जंगम त्यावेळी यांनी कोणताही विरोध केला नाही मग अजित मर्ढेकरांना आता कामाला सहकार्य करायला विरोध का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
नेहरू युवा मंडळाच्या माध्यमातुन परमेश्वरच्या पारा वरील पत्रा शेड दुरुस्ती करण्याबाबत दि. २३ जुलै २०१८ रोजी पासुन ग्रामपंचायतीकडे मागणी होवु सुध्दा काहीच केले नाही उलट आम्ही दुरुस्ती साठी दिपक पवारांच्या माध्यमातुन फंड घेतला असता त्यास विरोध केला जात आहे . दिपक पवारांच्या फंडातुन काम होतेय म्हणून प्रभारी सरपंच विरोध करीत आहेत असेही ग्रामस्थांनी यावेळी सांगीतले.
गावच्या विकासाला स्वतः निधी आणत नाहीत आणि आम्ही जर निधी आणला तर त्यास विरोध होत असेल तर आम्ही ग्रामपंचायत कर का भरावा असा प्रश्न उपस्थित करून प्रामाणिक काम करणाऱ्या महिलेवर अन्याय करून तिला सरपंच पदावरून पायउतार करणाऱ्या उपसरपंचांना पायउतार करावा लागेल असेही ग्रामस्थांनी सांगीतले.
गावाच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य ग्रामपंचायती करून गावच्या विकासासाठी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी करून गटविकास अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालुन ग्रामसेवकांना सुचना कराव्यात अन्यथा याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली जाईल असेही उपस्थित ग्रामस्थांनी सांगुन उपसरपंच तथा प्रभारी सरपंच अजित मर्ढेकर मनमानी कारभार करीत असुन भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप केला.



